प्रत्येक गोष्ट काही नैसर्गिक मर्यादा सोबत आणते. याला सदगुण आणि षडरिपू
दोनीही अपवाद नाहीत. परंतु मेख ही कि मर्यादा ओलांडल्याशिवाय प्रगती अथवा
अधोगती दोनीही शक्य नाही... सदगुण मर्यादा ओलांडतात तेंव्हा ते एकतर
दुर्गुण बनतात अथवा निष्क्रिय निर्गुणाचे सोंग घेतात... दुर्गुण मर्यादा
ओलांडतात तेंव्हा ते एकतर सदगुण बनतात अथवा विनाश निश्चिती करतात. मर्यादित
सदगुण व मर्यादित दुर्गुण हेच नैसर्गिक आहेत... या मर्यादा जोपर्यंत
माणसाला कळत नाहीत तोपर्यंत दोषांचे पद्धतशीर उदात्तीकरण आणि अतीव
सद्गुणांच्या हव्यासातून आलेली निष्क्रियता हे दोनीही होतच राहणार....
थोडक्यात काय --- माणसाने माणूस असण्याच्या नैसर्गिक मर्यादा ओलांडून त्याने देव अथवा दानव बनण्याचा प्रयत्न केला तर तो मानवी संस्कृतीच्या मुळावर उठलाच म्हणून समजा. अमेरिका किंवा आपले अध्यात्मिक सट्टेबाज या दोघांनाही मर्यादा समजल्या नाहीत, म्हणून मर्यादा उल्लंघन झाले. आपले अध्यात्मिक सट्टेबाज आपल्याला शतकानुशतके गरिबीत ठेवत आले आणि अमेरिकेची काही दशकांत कमावलेली श्रीमंती काही वर्षांत भिकेला लागली.... !
"जीवन तो संतुलन का नाम हैं, पार्थ... उसे तौलना सीखो"...हा श्रीकृष्णाचा संदेश आपण सारेच भौतिक आणि अध्यात्मिक सुख मिळाल्यावर विसरतो हेच खरे...!

No comments:
Post a Comment