सर,
तुम्ही
'मराठी'
शिकवलंत,
आज तिने आमच्या
अस्मितेची
जाणीव
प्रगल्भ
केलीय
...!
तुम्ही
'हिंदी'
शिकवलंत,
आज तिने आमची राष्ट्रीय
बांधिलकी
अधिक दृढ केलीय
...!
तुम्ही
'इंग्रजी'
शिकवलंत,
आज आम्ही
जगाच्या
जवळ पोहोचलोय
...!
तुम्ही
'संस्कृत'
शिकवलं,
आज आम्ही
गीतेसारखं
गुह्यतम
ज्ञान
आपलंसं
केलंय
...!
तुम्ही
'गणित'
शिकवलं,
आज आम्ही
'व्यवहार
चातुर्य'
आत्मसात
केलंय
...!
तुम्ही
'भूमिती'
शिकवली,
आज आम्ही
अनेक जटील आकृतिबंध
सोपे केलेत
...!
तुम्ही
'भौतिकशास्त्र'
शिकवले,
आज आम्ही
निर्जीवांतीलही
'अंतिम
सत्याचा'
ध्यास
धरतोय
...!
तुम्ही
'जीवशास्त्र'
शिकवले,
आज आम्ही
सजीवांचा
'आत्मा'
आणि निर्जीवांचा
'जीव' शोधतोय
....!
तुम्ही
'रसायनशास्त्र'
शिकवले,
आज आम्ही
मानवी
मनाचेही
'रसायन'
शोधण्याचे
धाडस करतोय...!
तुम्ही
'इतिहास'
शिकवलात,
आज आम्ही
नवा इतिहास
रचू लागलोय
...!
तुम्ही
'भूगोल'
शिकवला,
आज आम्ही
जग पादाक्रांत
केलंय....!
तुम्ही
'नागरिक
शास्त्र'
शिकवले,
आज आमच्यातला
नागरिक
'सुजाण'
बनलाय
..!
तुम्ही
'अर्थशास्त्र'
शिकवले,
आज आम्ही
अर्थकारणात
'माणूस'
पुढे आणतोय
...!
तुम्ही
खेळायला
शिकवले,
आज आम्ही
'खिलाडूवृत्ती'
मनापासून
जोपासतोय
....!
तुम्ही
'चित्रकला'
शिकवली,
आज आम्ही
आनंदरंगाची
उधळण करतोय
...!
तुम्ही
'अभियांत्रिकी'
शिकवली,
आज आमचा प्रत्येक
क्षण एक नित्यनवा
'आविष्कार'
घेऊन येतो...!
तुम्ही
अनेक
'विषय'
शिकवले,
आज तुम्ही
स्वतः
आमचा
'विषय'
झाला आहात...!
तुम्ही
आमच्या
आयुष्याचा
'पाया'
रचलात,
आज आम्हाला
'कळस' दूर नाही...!सर, तुम्ही अनोख्या प्रेरणेने आणि अविरत प्रयत्नांमधून
अगदी सहजतेने आमच्या चिमुकल्या मनांवर संस्कार केले
पण हे करताना तुम्ही आमच्याकडे आमचे 'यश' सोडून दुसरे काहीच मागितले नाही.
हा निस्वार्थीपणा केवळ दुर्मिळच ...!
आज आमचे हेच तुटपुंजे यश आम्ही तुम्हाला समर्पित करत आहोत.
सर, 'समर्पण' हाही तुमचाच संस्कार !
संस्कारांनी काठोकाठ भरलेली तुमची ओंजळ
तुम्ही कायमच आमच्यासाठी रिती केलीत
आज तीच ओंजळ
आम्ही एक जबाबदारी म्हणून
आता आमच्याकडे घेत आहोत,
अनेकांची जीवने समृद्ध करण्यासाठी !
कदाचित,
हीच असेल आमची खरी 'गुरुदक्षिणा' !
No comments:
Post a Comment