भरती ओहोटीला नसे,
गुरुत्वाकर्षण कारण
पृथ्वी भेटीचे रोज, येते सागरा उधाण
रोज नाकारीते, मागे लोटते, निष्कारण
क्षार ना करी, खारट हा सागर,
जिव्हारी लागला, पृथ्वीचा
नकार,
म्हणुनी अश्रूंचा, फुटला
रे बांध
पृथ्वी-परिवलनाने, न हो दिन-रात
आनंदाची गिरकी, घेई सूर्याच्या
प्रेमात
दिनी उजेडी सुखात, राती
अंधारी दुःखात
पृथ्वी-परिभ्रमणी, न हो महिना-साल
सूर्य-तेज ओढ, जरी करी
ही कमाल
जळे धरा प्रेमी, तरी
फिरे ती खुशाल
भौगोलिक सत्यांचा असे हा
भावनिक अर्थ
विज्ञानाचा पडताळा, नक्कीच ठरेल व्यर्थ
प्रेमाचा त्रिकोण, कल्पिला यमाने हा सार्थ
Nice one
ReplyDelete