चारोळ्यांचा अर्थ फक्त ‘चंगो’लाच
कळे ll धृ ll
एक ओळ तुझी,
एक ओळ माझी अशी कविता ना
बने
अशा जमल्या जरी चार तरी
बरेच
नांदतील तरी ‘चारचौघी’
नाहीतर, ‘चांडाळ चौकडी’
बनलायलाही वेळ न लागे .... १
फुकटच्या चार मधली
एक जरी गेली,
‘तिरळी’ ती बने
आणि एक जरी आली, ‘पाचोळी’
ती बने
मग प्रतिभेचा पाचोळा करायला
ती बघेना मागे पुढे .... २
शब्द शब्द गुंफून,
ओळी ओळी रचून
चारोळी योग्य तिला केले
पण वृत्त, गण, मात्रा, यमक
तर सोडाच
मुक्तछंद विसरून आम्ही
वाहतो निरर्थक मुक्ताफळे ...... ३
‘मी तिचा’ की ‘ती माझी’
या भांडणालाही अर्थ नसे
आसमानके तारे तोडण्याआधी ‘
मी माझा’ ओळखणे हेच योग्य
असे
पण यासाठी जातिचेच लागतात
हे कळायलाही वेळ लागे ..... ४
चंगोची चारोळी किती
सुबोध, सुरेख व समर्पक असे
इतरांचीही काही कमी असेल
असे नाही
पण ऐकून काही टुकार चारोळी
यमाला ही ‘आरोळी’ ठोकावी
लागे ...... ५
(माझी पहिली कविता, सन
१९९६)
No comments:
Post a Comment