भौतिकवादात एवढं
गैर ते काय ?
वस्तूंच्या प्रेमाचं इतकं
वैर ते काय ?
निर्जीवांवरील प्रेम कधी
सैरभैर होतं काय ?
भोगातील तृप्ती कधी
स्वैर असते काय ?
दगडातला विठोबा हा
भौतिक आहे काय ?
मर्सिडीजमधला विठोबा हा अध्यात्म
नाही काय ?
पंढरीच्या वाटेतच विठोबाची
ओढ असते काय ?
पब-बारच्या वाटा विठोबाकडे
नेत नाहीत काय ?
टाळ-मृदुंगातूनच काय
संगीत येतं काय ?
डीजे-बँजो-ड्रम हे
गरळ ओकतात काय ?
तल्लीनतेचा मक्ता काय
तुम्हीच घेतलाय काय ?
धिंगाण्यातील तल्लीनता तुम्हा कधी दिसली आहे काय ?
जीवघेण्या स्पर्धांचा एवढा तिटकारा तो काय ?
भजन-कीर्तनात कधी स्पर्धा नसते काय ?
तुमच्या स्पर्धाच केवळ आनंदासाठी असतात काय ?
आमच्या स्पर्धा आम्ही दुःखासाठी करतो काय ?
व्यसनाधीन या जगी फक्त आम्हीच आहोत काय ?
टाळकरी-माळकरी यांना एकही व्यसन नाही काय ?
जगण्यातल्या नशेतच फक्त विठोबा आहे काय ?
नशेतल्या जगण्यातसुद्धा विठोबाच नाही काय ?!
आम्ही आमचे वागतो तेंव्हा, तुमच्याबद्दल आदर बाळगत नाही काय ?
तुम्ही कसेही वागोत आमच्याबद्दल कायम खडे फोडत नाही काय ?
आमची दिशा विनाशाची ! हे आम्ही जाणत नाही काय ?
अध्यात्माच्या भांडवलदारांनो,
खरं
सांगा, तुमची नेमकी दिशा काय ?
No comments:
Post a Comment