एक निर्मल असं गाव होतं, कलाकारांच
माहेर होतं
हौश्या-गवश्या-नवश्यांचं, एक
पवित्र विद्यापीठ होतं
जिवा-शिवा दोन कलाकार मित्र,
एकाच घरात रहात होते
पांढरा रंग, पांढरी वस्रे, पांढऱ्या
चारित्र्याचे भक्त होते
कोणजाणे कशी माशी शिंकली, होवू
नये ते होवून गेले
जिवाच्या पांढऱ्या सदऱ्यावर,
एकदा काळे डाग पडून गेले
काळा डाग असलेला पांढरा
सदरा, जीवाने लगेच टाकून दिला
काळ्या डागाची चीड जपत, नवा
पांढरा सदरा विकत घेतला
शिवाने, सुंदर नक्षी काढून
तो काळा डाग छान रंगवला
जिवाला सांगून शिवाने तो नक्षीदार
सदरा पुन्हा वापरला
जिवाने, काळा डाग नको
म्हणून पांढरा सदराच फेकून दिला
शिवाने, पांढऱ्याची सोबत
सुटू नये म्हणून काळा डागही सुंदर केला
दोघेही शुभ्र जीवनात,
पांढरेपणाच्या भक्तीत आपापल्या मार्गाने रमत गेले
जिवाजी स्वतःची उंची वाढवत
गेले, तर शिवाजी कलेची उंची वाढवत गेले
आज ‘दैनिक निर्मल’ला बातमी
होती, नगरात अश्रूंचा महापूर आला
जिवाजींनी जीव दिला, तर,
शिवाजींना ‘जीवनगौरव’ मिळाला
No comments:
Post a Comment