कशाला तुझ्या, माथी जिम्मा
रं
खेळू फुगडी, आन झिम्मा रं ll
धृ ll
टाक बाटली, फेक साल रं
पाकिटांची तू, कर घाण रं
गाडीतून तू, थुक मागं रं
रस्ता हाय तो, माह्या बाचा
रं ll १ ll
दिसलं कुत्रं, ठोक त्यास रं
मुकं जित्राब, मुकं मार रं
तुझं नी त्येचं, काय जोड रं
कुत्ता येकला, माह्या बाचा
रं ll २ ll
ठोकली गाडी, काच फुटं रं
रानोमाळ ती, मग पांगं रं
वरून गाडी, तशी घाल रं
काच फुटकी, माह्या बाची रं ll
३ ll
सालीवरन, पडं खाली रं
कुत्ती हुंगती, काचा पायी
रं
बाईल तुझी, मरं रस्ती रं
तुझी कशी? छे ! माह्या बाची
रं ll ४ ll
No comments:
Post a Comment