सानुले रोप, मातीत जन्मले
उभे वाढले, आडवे रुंदावले
उभे-आडवे झाड, उन्हात वाळले
वाळून, उन्मळून, आडवे मरून
पडले
मरून पडताना, मातीतच रुतले
जिथे ते रुतले, तिथेच ते
रुजले
आडवे वाढले, उभे रुंदावले
तयारही झाले, झेलण्या
उन्हे
पुन्हा एकवार, नशिबी
वाळणे
वाळून मरणे, नि मरून जन्मणे
!
कसले मरणे ? कसले जन्मणे ?
भ्रम रे जाणे-येणे, सच्चे
येथे जगणे !!
--- यम (यशवंत महाकाळ)
ऑक्टोबर २४, २०१४
No comments:
Post a Comment