सागरतीरी, धरणीच्या कडेवर,
एक हिरवा डोंगर
लाटांचे अखंड अभिषेक, लाटांचेच
मंत्रोच्चार गंभीर
निळं आभाळ, हिरवी झाडी, पक्षांची
साथ मधुर
ब्रम्हांडलीलांच्या
साक्षीला एक पिंडीतला शंकर
‘निर्गुण निराकारा’त लीन सारे
‘सगुण साकार’
वारा,पक्षी,पाने, लाटा करती
‘अनाहता’शी एकस्वर
सृष्टीचे बहुरंग भक्तिरंग
झाले, रंगास त्या महापूर
पिंडीचे ब्रम्हांड झाले,
द्वैतास भेटे, अद्वैताचे माहेर
--- यम (यशवंत महाकाळ)
ऑक्टोबर २४, २०१४
No comments:
Post a Comment