(जयललिता आणि तमिळनाडूतील जनतेस समर्पित)
अरे तुझ्यासाठी राजा, आज येडी झाली प्रजा
अजब तुझी माया, राजा, अजब तुझी प्रजा
लाखांच्या लंगोटांनी लपवली तुझी लज्जा
कोटींच्या धोतरावरी केलास तू कब्जा
प्रजेच्याच पैशावरी मारलीस तू मजा
तुझ्या बुऱ्या कमाईचा, झाला गाजावाजा
अजब तुझी माया, राजा, अजब तुझी प्रजा ....१
‘शून्य’ चिरडून प्रजेचे, तू ‘शंभर’ केल्या गरजा
‘माया’ जमवून तिला, दिला ‘उत्पन्ना’चा दर्जा
‘स्थावर’वर ‘स्थिरस्थावर’ तुम्ही इजा-बिजा-तिजा
‘जंगम’ केली लंपास तरी, प्रजेने मांडली तुझी पूजा
अजब तुझी माया, राजा, अजब तुझी प्रजा .... २
पितळ तुझे पाडी उघडे, चाले ‘करुणाकरा’चा भेजा
न्यायदेवीच्या तेजापुढे त्याने झुकविले तुला राजा
बोथट, बथ्थड, बधीर, बहिरी, बावळट तुझी प्रजा
वाट लावूनी गेलास तू तरी तुझाच वाजवते बाजा
अजब तुझी माया, राजा, अजब तुझी प्रजा ....३
संपले राज्य तुझे राजा, आड केले तुला गजा
राज्य चालवी प्रधान, आता, झाला नवा राजा
प्रधान, मंत्री सारे रडती, रोज कहर करी प्रजा
तुझ्या नावे जीव देई , रोज जीव घेई प्रजा
अजब तुझी माया, राजा, अजब तुझी प्रजा .... ४
... यम (यशवंत महाकाळ)
ऑक्टोबर १, २०१४.

No comments:
Post a Comment