‘शरदा’च्या चार चांदोबांनी,
आज दाखविले षंढत्व
पराजित ढोंगी नामर्दांनी,
आज हरविले ‘अजित’त्व
‘पृथ्विराजा’च्या संमतीने,
जनता भोगी नरकत्व
फुकाचे रे लोकशाहीत्व, फुकाचेच
रे पालकत्व !
‘श्री-कर’ छाटुनी सर्व, पत्करी
अफजुल्याचे पाईकत्व
अतिक्रमणाच्या बदल्यात
पाडती लोकशाहीचेच तत्व,
सरकारी वाघनखांनी, पहा,
शिवराय मरती रोज
‘स्वदेशी’ मोगलांनी,
सुराज्या, ‘परदेशी’ धाडिले आज
--- यम (यशवंत महाकाळ)
फेब्रुवारी ८, २०१४
(पिंपरी-चिंचवडचे आयुक्त
डॉक्टर श्रीकर परदेशींच्या बदलीच्या निमित्ताने)
No comments:
Post a Comment