तो होता उथळ, ती होती खोल
भेटीअंती पहिल्याच, झाले मनोमिलन
तिने त्याला तिच्या मनाची खोली दिली,
त्याने तिला उथळ असे काही क्षण दिले.
कधी उथळ कधी खोल गप्पा होत होत्या
दोहोंमधील प्रेमाला आता त्या पूरक होत्या
पुरुषप्रधान संस्कृतीत वाढले होते दोघे,
याचेच परिणाम नकळत या नात्यात दिसत होते
नात्यामधला उथळपणा हळू हळू वाढत होता
नात्यामधल्या खोलीलाही कमी कमी करत होता
उथळपणा जिवंत ठेवण्यासाठी खोली रोज मरत होती,
उथळपणातील आनंद शोधताना खोली हरवून बसली होती
तिने खोली हरवली होती..पण स्वतः हरली नव्हती
स्वतःला पुन्हा शोधण्याची ताकद ती विसरली नव्हती
विचार केला, धीर धरला, एकाग्र ती राहिली
उथळपणा कमी करण्याची खुणगाठ तिने बांधली
गप्पा तिने चालू ठेवल्या, विषय मात्र बदलले
उथळपणा, उपभोग जावून त्याग आणि प्रेम आले
शरीर सोडून मनाकडे यावे असे त्याच्या बुद्धीला सांगितले
उपभोगाच्या महालातून त्याला त्यागाच्या मंदिरात आणले
त्याग त्याला जड गेला, विचारच तसा नव्हता केला
विचार पुरा नाही, सरावही हवा, असा टोला तिने दिला.
उपभोगाची सवय टाळून त्यागाची सवय हवी होती
शाश्वत प्रेमाच्या वृक्षासाठी अश्या बीजाची गरज होती
तिचा हेतू त्याला पटला, प्रेमापोटीच सारे आहे
उपभोगापेक्षा त्यागातील आनंद मोठा आहे.
उपभोग सोडताना त्रास होत होता, सहन त्याने केला
स्वतःचे मन मारून, प्रेमासाठी त्यागाचा श्रीगणेशा केला
आता त्याग रोजचा आहे, उपभोगाची उरली आठवण
त्यागाने बहरलेला प्रेमवृक्ष पाहून त्याचे भरून येते मन
भरल्या मनी विचार करी, आत्ता त्यागच सर्वस्व आहे
मग सुरुवातीपासून उपभोगाचे एवढे का वर्चस्व आहे ?
विचारी तो खोलीला, तुला कसा त्याग कळतो, मला का नाही
उत्तर तिचे सोपे---" स्वभाव कळतो, पण स्वीकार आणि बदल होत नाही "
"पुरुषाला शाप मोहाचा, स्रीला मर्यादेचे वरदान, हे स्वभाव जरी खरे
स्रीने पौरुषत्व घ्यावे, पुरुषाने मर्यादी, त्यागी व्हावे हे बदल करावे बरे! "

No comments:
Post a Comment