Friday, February 22, 2013

आधी बीज एकलें

आधी बीज एकलें
बीज अंकुरलें रोप वाढलें
एका बीजापोटीं, तरु कोटी कोटी
जन्म घेती, सुमनें फळें
व्यापुनि जगता तूंहि अनंता
बहुविध रूपें घेसी, घेसी
परि अंती, ब्रम्ह एकलें

संत तुकाराम चित्रपटातील, शांताराम आठवले यांचं हे गीत काल अनेक वर्षांनंतर ऐकले.
'आधी बीज एकलें' ते 'अंती, ब्रम्ह एकलें' ही जीवनातील सत्य सहज सांगणारे हे गीत.

जीवन आणि त्यातील विविधता हे खरेच.
जीवनाची सुरुवात बीज रूपाने आणि अंत ब्रम्हरुपाने जरी होत असला तरी या दोनीही अवस्था एकच आहेत.
बीजरूप आणि ब्रम्हरूप एकच आहे.
विश्वात विविधता दिसत असली तरी विश्वातील चैतन्य एकच आहे.

No comments:

Post a Comment