ये सखी, ये अशी जवळ ये माझ्या,
मिठीत ये,
….
आलीस ?
….
आता मिठी घट्ट कर, शांत उभी रहा, डोळे मिट …
माझा श्वास ऐक, त्याचा ताल ऐक,
त्याच्याशी ताल मिळव,
….
मिळवलास ?…
….
आता तुझे मन त्या तालावर नाचू लागेल …!
…
मी आहे, इथेच आहे, तुझ्यासोबत !
डोलतोय तू धरलेल्या तालावर … तुझ्यासोबत !
…
ऐक सखी,
दोघांचीही पावले आता त्या एकाच तालावर पडत आहेत …
एक ताल … एक पाऊल … एक तू …. एक मी
…
वाटतं,
ही वेळ आता इथेच थांबावी,
हा काळ ही आता इथेच थांबावा
भान विसरून,
आपल्या मिठीकडे कौतुकाने पहात … !
…
पहा सखी,
तो काळ थांबलाय … विश्व थांबले आहे …
चालू आहे तो केवळ तुझा नि माझा श्वास
ऐक सखी ,
आता आपले श्वासही एक होतील,
अन उरेल, तुझा नि माझा असा एकच श्वास,
श्वास … आपल्या प्रेमाचा
श्वास …. आपल्या सहजतेचा
श्वास … आपल्या सुंदरतेचा
श्वास … आपल्या खरेपणाचा
श्वास … आपल्या मोकळेपणाचा
श्वास … आपल्या उत्कटतेचा
श्वास … आपल्या एकरूपतेचा
...
सखे, अनुभव …
आता तो श्वासही थांबला आहे
आता केवळ शांतता, … निरव शांतता
मिठीत ये,
….
आलीस ?
….
आता मिठी घट्ट कर, शांत उभी रहा, डोळे मिट …
माझा श्वास ऐक, त्याचा ताल ऐक,
त्याच्याशी ताल मिळव,
….
मिळवलास ?…
….
आता तुझे मन त्या तालावर नाचू लागेल …!
…
मी आहे, इथेच आहे, तुझ्यासोबत !
डोलतोय तू धरलेल्या तालावर … तुझ्यासोबत !
…
ऐक सखी,
दोघांचीही पावले आता त्या एकाच तालावर पडत आहेत …
एक ताल … एक पाऊल … एक तू …. एक मी
…
वाटतं,
ही वेळ आता इथेच थांबावी,
हा काळ ही आता इथेच थांबावा
भान विसरून,
आपल्या मिठीकडे कौतुकाने पहात … !
…
पहा सखी,
तो काळ थांबलाय … विश्व थांबले आहे …
चालू आहे तो केवळ तुझा नि माझा श्वास
ऐक सखी ,
आता आपले श्वासही एक होतील,
अन उरेल, तुझा नि माझा असा एकच श्वास,
श्वास … आपल्या प्रेमाचा
श्वास …. आपल्या सहजतेचा
श्वास … आपल्या सुंदरतेचा
श्वास … आपल्या खरेपणाचा
श्वास … आपल्या मोकळेपणाचा
श्वास … आपल्या उत्कटतेचा
श्वास … आपल्या एकरूपतेचा
...
सखे, अनुभव …
आता तो श्वासही थांबला आहे
आता केवळ शांतता, … निरव शांतता
अनुभव …
आपण दोघेही आता स्वतःला विसरलो आहोत,
आता आपल्याला मन नाही
आता आपल्याला शरीर नाही
आता आपल्याला बुद्धी नाही
न कोणता विचार,
न कोणता विकार
श्वासही उरले नाहीत,
एकरूपतेकडून ते आता शून्यत्वाकडे चालले आहेत
आधी खूप होते, मग दोन राहिले,
मग एक झाले नि आता शून्य झाले आहेत…
….
सखी, अनुभव,
अनुभव हे शून्य…
एकरूपतेच्या पलीकडे जावून,… अनुभव हे शुन्य !
ही शून्याची अनुभूती, आपण दोघेही आता स्वतःला विसरलो आहोत,
आता आपल्याला मन नाही
आता आपल्याला शरीर नाही
आता आपल्याला बुद्धी नाही
न कोणता विचार,
न कोणता विकार
श्वासही उरले नाहीत,
एकरूपतेकडून ते आता शून्यत्वाकडे चालले आहेत
आधी खूप होते, मग दोन राहिले,
मग एक झाले नि आता शून्य झाले आहेत…
….
सखी, अनुभव,
अनुभव हे शून्य…
एकरूपतेच्या पलीकडे जावून,… अनुभव हे शुन्य !
हेच खरे मिलन !
हेच ते मिलन,
सगुण साकारांचे, निर्गुण निराकार, शून्यमय मिलन…!
आपले मिलन … !!
मिठीने सुरु होणारे,
एकरूपतेकडून शून्याकडे नेणारे
असे मिलन
जिथे तू नाहीस,
जिथे मी नाही
जिथे काहीच नाही
असे मिलन … !
No comments:
Post a Comment