असंख्य सूर्यांच्या असंख्य किरणांमधील
उर्जा
ज्याक्षणी तेजोमय प्रकाश ओकत होती
त्याक्षणी पृथ्वीवरील काही अभागी शरीरं
असंख्य अंधारयातना भोगत होती…
त्यांत तुही होतास,
तुझ्या वाट्याचा अंधार सहन करत …!
निर्मिकाच्या निर्मितीतील मर्यादांचे
क्रूर वास्तव हसत हसत झेलीत, शांतपणे…!
ना कधी त्रागा केलास, ना कधी चिडलास,
ना कधी सहानुभूती मागितली, न ती कधी स्वीकारली
ना कधी 'त्या'च्या मर्यादांचा उद्धार केलास
ना कधी दुर्दैवी नि दुर्बलांच्या पंक्तीत बसलास
भौतिक अंधाराच्या मर्यादा तू कायमच तुच्छ मानल्यास
अन, आत्मिक चैतन्याच्या कक्षा नियमित रुंदावत नेल्यास
स्वतःची दुःखे विसरून, इतरांची आपली मानलीस,
जगत-कल्याणाची ताकद स्वतःत निर्माण करत राहिलास, समर्थपणे ….!
तुझे अंतरीचे चैतन्य, आज, ज्ञानाचा प्रकाश घेवून आले आहे
तुझे सखोल ज्ञान, आज, अनेकांचे ज्ञान-चक्षु बनले आहे,
तुझे अभिनव उपक्रम, आज, अनेकांना उत्कर्षाची प्रेरणा देत आहेत,
तुझी सुबोध उत्पादने, आज, अनेकांचे जीवन सुखकर करत आहेत,
आणि, तू स्वतः, आज, या भारतवर्षाचा आदर्श बनला आहेस…
एवढी उंची गाठल्यावरही तू यशाने बेभान होत नाहीयेस,
विनम्रपणे जमिनीवरच राहून, तू, अंतरात्म्याची खोली शोधत आहेस
अंतरीच्या चैतन्याला आव्हान देत आहेस, नवतेज निर्मित आहेस, विजीगिषु वृत्तीने ….!
हे प्रशांतसूर्या,
तुझ्या याच तेजात ताकद आहे,
त्या असंख्य सूर्यांच्या असंख्य किरणांनी
निर्माण केलेला अंधार मिटवण्याची,
तिमिरमुक्त सृष्टी निर्माण करण्याची …!
त्यासाठीच,
मित्रा, तू तळपत राहा …!!

No comments:
Post a Comment